महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे, सरकारने आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण सात हप्ते जमा केले आहेत.
पण जानेवारी महिन्यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता. यावर स्पष्टीकरण देताना सरकारने सांगितले की, ‘आम्ही महिला दिनाच्या दिवशी, म्हणजेच ८ मार्च २०२५ रोजी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते, म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपये, असे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहोत.

पण ८ मार्च रोजी महिलांच्या बँक खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले. त्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत! तर, या लेखात आपण मार्च महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये मिळाले
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण सात हप्ते जमा झाले आहेत, आणि प्रत्येकी दहा हजार पाचशे रुपये सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. आता सरकार लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता एकत्रितपणे देणार आहे. त्यानुसार, लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये मिळतील. आठव्या आणि नवव्या हप्त्याचे पैसे मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारमार्फत 13 हजार 500 रुपयांची रक्कम जमा होईल.
लाडकी बहीण योजना: Ladki Bahin Yojana February March Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. तसेच, आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आता महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यात आला आहे. म्हणजेच, एकूण पंधराशे रुपये जमा झाले आहेत. सरकारने असे सांगितले होते की, आम्ही तुम्हाला एकूण तीन हजार रुपये देणार आहोत, म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आम्ही तुम्हाला एकत्रित देणार आहोत. पण महिलांच्या बँक खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेच जमा झाले आहेत.
महिला व बालविकास मंत्री यांची घोषणा: Ladki Bahin Yojana Installment Date
याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ८ मार्च २०२५ रोजी 10 वाजून 02 मिनिटांनी ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आम्ही फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण दोन टप्प्यात तीन हजार रुपये जमा करणार आहोत. त्यामुळे सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील. याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे!
conclusion
लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचे तीन हजार रुपये कधी जमा होणार आहेत, याबद्दलची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. ही महत्त्वाची माहिती तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा.