Ladki Bahin 8th Installment New Update: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची रक्कम देण्यात येते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सात महिन्यांचे पैसे जमा केले आहेत.
आता या योजनेच्या आठव्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आठव्या हप्त्याचे पैसे सरकार सर्वच महिलांच्या बँक खात्यात पाठवणार नाही. केवळ विशिष्ट महिलांनाच हा आठवा हप्ता मिळणार आहे. या आठव्या हप्त्याबाबतची नवीन माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सविस्तरपणे सांगणार आहोत, म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin 8th Installment New Update
महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेद्वारे गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने 2.4 कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयांचे सात हप्ते जमा केले आहेत.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
महाराष्ट्र सरकारने जानेवारी महिन्याचे पैसे २४ जानेवारी २०२५ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत करोडो महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले. आता या योजनेच्या आठव्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या आठव्या हप्त्याचा लाभ म्हणजेच पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया २५ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण केली असून, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये हा लाभ महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. परंतु या योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे अनेक महिलांच्या बँक खात्यांमध्ये आता जमा होणार नाहीत. तथापि, यापुढील लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता अपात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही.
आता या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचे नियम न पाळता लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन आहे आणि त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्याला नोकरी आहे, तसेच तो इतर कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे, अशा महिलांना महाराष्ट्र सरकारने या योजनेतून अपात्र घोषित केले आहे.
सरकारने असे सांगितले आहे की, आता या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याचा किंवा यापुढे मिळणाऱ्या हप्त्यांचा लाभ मिळणार नाही.