Flipkart Foundation Scholarship Program 2025: विद्यार्थी मित्रांनो, फ्लिपकार्ट फाऊंडेशनने ‘फ्लिपकार्ट फाऊंडेशन स्कॉलरशिप प्रोग्राम २०२५’ ची सुरुवात केली आहे. यामध्ये किराणा दुकान मालकांच्या विद्यार्थ्यांना फ्लिपकार्ट फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, या शिष्यवृत्तीच्या मदतीने फ्लिपकार्ट फाऊंडेशन पात्र, गुणवंत आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. फ्लिपकार्ट फाऊंडेशन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत, म्हणजेच स्कॉलरशिप दिली जाईल. आता यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, हे बघण्यासाठी एक विनंती आहे, की हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन यासाठी ऑनलाईन अर्ज भरा.

Flipkart Foundation Scholarship In Marathi
किराणा दुकानदारांच्या मुलांना आर्थिक अडचणींचा विचार न करता उच्च शिक्षण घेता यावे, हाच या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी सहज अर्ज करू शकतात आणि यासाठी पात्र ठरू शकतात. या शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थ्यांना योग्य रोजगाराच्या संधी मिळतील, तसेच ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पदवी पूर्ण करू शकतील आणि स्वावलंबी बनतील.
Flipkart Foundation Scholarship Program Highlights
योजनेचे नाव | फ्लिपकार्ट फाउंडेशन शिष्यवृत्ती कार्यक्रम |
लाँच करणारे | फ्लिपकार्ट फाउंडेशन |
लाँच तारीख | 2024 |
जाहीर करणारे | फ्लिपकार्ट फाउंडेशन |
उद्देश | शिष्यवृत्ती प्रदान करणे |
लाभार्थी | विद्यार्थी |
लक्ष्य लाभार्थी | STEM मध्ये पदवीपूर्व पदवी घेत असलेले विद्यार्थी |
फायदा | INR 50,000 चे आर्थिक सहाय्य |
पात्रता निकष | किराणा स्टोअर मालकांची मुले |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, बँक खाते |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | Flipkart Foundation Scholarship Program |
आर्थिक मदत | INR 50,000 |
अपेक्षित लाभ | INR 50,000 ची आर्थिक मदत |
संपर्क तपशील | 080-6798000 |
Flipkart Foundation Scholarship Eligibility Criteria In Marathi
- अर्जदार विद्यार्थ्यांनी भारतातील शासकीय महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक पदवी तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एका सदस्याकडे किराणा दुकान असावे आणि तो किराणा दुकानाचा मालक असावा.
- विद्यार्थ्यांनी त्यांच्या बारावीच्या परीक्षेत किमान ६०% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नसावे.
- फ्लिपकार्ट ग्रुप आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतील. ते अर्ज करू शकणार नाहीत.
Flipkart Foundation Scholarship Required Documents
- Aadhar Card
- Mobile Number
- Electricity bill
- Address Proof
- PAN Card
- Ratio card
Flipkart Foundation Scholarship Financial Benefits In Marathi
ज्या विद्यार्थ्यांनी फ्लिपकार्ट शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला असेल आणि त्यांची निवड झाली असेल, त्यांना फ्लिपकार्ट फाउंडेशनतर्फे 50,000 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
Flipkart Foundation Scholarship Salient Features
- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी 2025 पूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- आता ज्या विद्यार्थ्यांचे पालक किराणा स्टोअरचे मालक आहेत, अशा विद्यार्थ्यांचे सामाजिक स्थान आणि जीवनमान उंचावण्यासाठी फाउंडेशनने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
- या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
Flipkart Foundation Scholarship Apply Online In Marathi
- या शिष्यवृत्तीसाठी पात्रता आणि निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फ्लिपकार्ट फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर विद्यार्थी मुख्य पानावर पोहोचतील. त्यानंतर त्यांनी ‘अर्ज करा’ हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करावे.
- आता त्यांच्या संगणकाच्या स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल. विद्यार्थ्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
- आता अर्जाचा नमुना त्यांच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल. हा नमुना त्यांनी अगदी व्यवस्थित भरावा.
- नमुना भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नमुन्यात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासावी. सर्व माहिती बरोबर असल्यास ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करावे.
Important Links
फ्लिपकार्ट फाउंडेशन शिष्यवृत्ती कार्यक्रम 2025 चे लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे?
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे किराणा दुकान आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, असे सर्व विद्यार्थी फ्लिपकार्ट फाउंडेशन शिष्यवृत्ती 2025 साठी अर्ज करू शकतात.