Bank of Maharashtra SO Vacancy: तुम्ही जर चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर शिक्षण अभियंता क्षेत्रातून पदवीधर झालेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. देशातील नावाजलेल्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच, ज्या उमेदवारांनी अभियंता क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतले आहे, ते देखील अर्ज करू शकतील.
तुम्ही या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, परीक्षा शुल्क आणि मुदत याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा.

Bank of Maharashtra SO Notification 2025 In Marathi
इच्छुक उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी राज्यभरातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 272 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे तुम्हाला नोकरीसाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. तसेच, सरकार अंतर्गत येणाऱ्या या पदासाठी उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती खालील परिच्छेदात दिली आहे.
Bank of Maharashtra SO Educational Qualification 2025
भरतीचे नाव | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 |
---|---|
भरती विभाग | बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे |
भरती श्रेणी | सरकारी नोकरीच्या संधी |
पदाचे नाव | स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) |
उपलब्ध पदसंख्या | एकूण 0172 जागा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र राज्य |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | कम्प्युटर अथवा आयटी क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा |
Bank of Maharashtra SO Bharti 2025 Last Date
- भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे.
- वेतनश्रेणी – रु. ६००००-१०००००/- महिना
- अर्ज करण्याची प्रक्रिया – सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यासाठी शुल्क – १००० रुपये + १८० रुपये (GST)
- वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी ३० ते ५५ वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असतील.
आवश्यक कागदपत्रे
- सपोर्ट साईझ फोटो
- आधार कार्ड/पारपत्र/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे (आवश्यक असल्यास)
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |